आनंदवार्ता! सणासुदीच्या काळात खाद्यतेल झाले स्वस्त

सणासुदीच्या काळात खरीप तेलबिया पिकांची आवक वाढल्याने, गेल्या आठवड्यात देशातील खाद्यतेल-तेलबिया बाजारात सर्व तेल आणि तेलबियांच्या किमतीत घसरण दिसून आली.या काळात मोहरी, सोयाबीन, शेंगदाणा तेल-तेलबिया, कच्चे पामतेल, पामोलिन आणि कापूस तेलाचे भाव घसरले. आयात शुल्क वाढवल्यानंतर खाद्यतेलाची महागाई वाढेल, ही खाद्यतेल-तेलबिया व्यवसायावरील टीकाकारांची भीती निराधार ठरली असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. याउलट आयात शुल्कात वाढ केल्यानंतर गुजरात आणि राजस्थानमध्ये शेंगदाणासारख्या महागड्या खाद्यतेलाच्या घाऊक दरातही घसरण झाली आहे. शेंगदाणा तेलाचा घाऊक भाव १३ रुपयांनी स्वस्त झाला आहे.