शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना महूद जिल्हा परिषद गटाच्या वतीने महूद बु येथे 3000 मोटारसायकल रॅलीचे व भव्य मेळाव्याचे आयोजन हे मंगळवारी म्हणजेच वीस ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे.
सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मा. धैर्यशील मोहिते पाटील हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार भाई बाळाराम पाटील असणार असून वक्ते माजी आमदार व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामहरी रुपनवर आपले विचार हे व्यक्त करणार आहेत.
सदर मेळाव्यास सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी तसेच आबासाहेबांवर प्रेम करणारे अनेक मान्यवर या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी, युवकांनी, कष्टकऱ्यांनी महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होऊन मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी केलेले आहे.
या मेळाव्याचे सुरुवात 3000 मोटार सायकलच्या भव्य रॅलीने दुपारी तीन वाजता होणार असून रॅलीमध्ये सर्व मान्यवर सुद्धा सहभागी होणार आहेत. या रॅलीमध्ये पारंपारिक वाद्याबरोबरच नाविन्यपूर्ण वाद्यांचा ही समावेश असणार असून जेसीबीतून पुष्पवृष्टी होणार आहे.