हाळवणकर गोटात अस्वस्थ! भाजप नेत्यांनी दिलेला शब्द अद्याप…..

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र समोर आली. अनेक पक्षप्रवेश देखील झाले. महायुतीला यश प्राप्त झाले. लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने यांना मताधिक्य दिले. तर विधानसभेला डॉ. राहुल आवाडे यांना मताधिक्क्य मिळाले. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देत असताना आपल्याच पक्षात कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय थोपवण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी विधान परिषद, महामंडळ आणि समित्यांच्या पदावर नियुक्ती करण्याचं आश्वासन दिलं होतं. इचलकरंजी शहरात देखील अनेक राजकीय समीकरणे पहायला मिळाली.

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना थांबवत नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राहुल आवाडे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या विधान परिषदेसाठी भाजपमधून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव आघाडीवर आहे. तर भाजप नेते महेश जाधव हे देखील विधान परिषदेवर जाण्यासाठी आग्रही आहेत.माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना तात्काळ विधानपरिषदेवर संधी द्यावी, विलंब का केला जात आहे, अशा तिखट भावना भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या मतदारांतून व्यक्त होत आहेत.

हाळवणकर यांनी महायुतीचा धर्म आणि पक्ष वाढीसाठी आजपर्यंत केलेले प्रयत्न या निवडणुकीत दिसून आले. परंतु भाजप नेत्यांनी त्यांना दिलेला शब्द अद्याप पाळलेला नाही, त्यामुळे हाळवणकर गोटात कमालीची अवस्थता आहे.