हातकणंगले येथील एका खासगी इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थी टॅक्सीमध्ये चार वर्षाच्या मुलांना कोंडून चालक गायब झाल्याने मुलांची घुसमट झाली.त्यांनी एकच आरडा-ओरडा सूरू केला. श्वास कोंडल्याने गुदमरलेल्या मुलांच्या दंग्याने गल्लीतील पालक गोळा झाले. गाडीच्या काचा फोडून मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सूरू असताना शाळेचे व्यवस्थापन हजर झाले आणि मुलांची सुटका झाली.मंगळवारी सकाळी १२ च्या सुमारास खासगी इंग्रजी शाळेतील चार मुले एका चारचाकी व्हॅन मधून घरी परतताना चालकाने ही गाडी गल्लीमध्ये थांबवून त्यामध्ये असलेल्या चार मुलांना गाडीचे दरवाजे, काचा बंद करुन कोंडून घातले आणि चालक गायब झाला. या प्रकाराबद्दल पालकांनी शाळेविरुद्ध संताप व्यक्त केला.
Related Posts
संजय गांधी लाभार्थ्यांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा
हातकणंगले संजय गांधी निराधार योजना कार्यालयामार्फत संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी आदी विविध योजनांचे कामकाज हातकणंगले तहसील कार्यालयातून चालते. परंतु,…
तारदाळचे तलाठी कार्यालय हाऊसफुल्ल!
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला…
शिवसेनेची मशाल मिरवणूक युवावर्गाला आदर्शवत……
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी व त्यांचे विचार सदैव तेवत ठेवण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात…