अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून ‘घड्याळ’ चिन्हावर जयंतरावांना फाईट देण्याच्या भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या मनसुब्यांना धक्का लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने अचानकपणे गौरव नायकवडी यांना मुंबईला पाचारण केले आहे. परिणामी इस्लामपूर मतदार संघात अचानक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. महायुती गोंधळात आहे.
लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात निशिकांत पाटील यांनी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मदत केली नव्हती, अशा तक्रारी झाल्या. पाटील यांनी राजू शेट्टींचा प्रचार केल्याची चर्चा रंगली. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत पाटील यांच्याकडे विचारपूसही केली होती. तीच नाराजी आता निशिकांत यांच्यासाठी अडचणीची ठरते आहे का, अशी चर्चा मतदार संघात रंगली आहे.