इचलकरंजी शहर काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य, विविध समाज संघटना, संस्थांचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ बुधवारी अजिंक्यतारा येथे काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची भेट घेऊन काँग्रेसतर्फे इचलकरंजी विधानसभेसाठी संजय कांबळे यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ पारंपारिक काँग्रेसकडे असून काँग्रेस पक्षाला कशा पद्धतीने उमेदवारी दिली तर विजयी होईल याबाबतचा आढावा मांडण्यात आला. तसेच उमेदवारी बाबत जोरदार व आक्रमक मागणी केली. संजय कांबळे यांचे विविध पक्षांशी असलेले संबंध, सर्वांना एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची क्षमता, महाविकास आघाडीत निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार असल्याबाबत समर्थकांनी समर्थन केले.