सतेज पाटील यांनी लगावला मिश्किल टोला…

मराठा मंडळ सांस्कृतीक भवन येथे महाविकास आघाडीच्या वतीने परिवर्तन नियोजन मेळावा आयोजित केला होता. यावेळी सतेज पाटील म्हणाले माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी जोरदार बॅटिंग केल्याचा उल्लेख करत हाळवणकर, हिंदुराव शेळके व अरुण इंगवले हे जुने मित्र असल्याचे संपूर्ण जिल्ह्याला माहिती असून हे तिघेही एकाच दिशेने जातात. गाडी कोण पुढे न्यायची इतकाच प्रश्न असतो.

मात्र, तिघांची लाईन एकच असते. असे म्हणत हिंदुराव शेळके आले आहेत असे सांगत शेवटच्या चार दिवसात आपण हाळवणकर यांनाही घेऊन या असा मिश्किल टोलाही पाटील यांनी लगावला. इचलकरंजी शहर हे हिशोब ठेवणारे शहर असून ज्यांनी पाणी व वीज दर संदर्भात फसवलं त्यांचा हिशेब चुकता करा असे आवाहन पाटील यांनी केले.तसेच राज्यात शंभर टक्के महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे सांगत शहरातील महत्त्वाचा पाणी प्रश्न, वस्त्रोद्योगातील प्रलंबित प्रश्न सोडवून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी काँग्रेसचे शशांक बावचकर, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष वैभव उगळे,प्रताप होगाडे,अजित मामा जाधव, माजी नगराध्यक्षा मेघा चाळके, संजय कांबळे, राहुल खंजीरे,रणजित जाधव आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.