गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर सुहास भैया बाबर आणि संभाजी शेठ पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

मंगळवारी शिवसेना पक्षाच्या वतीने विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये सुहास भैया बाबर यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळाली. आज गुरुपुष्यामृताच्या शुभमुहूर्तावर खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी सुहास भैया बाबर यांनी अर्ज दाखल केला. मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थित सुहास भैयांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुहास भैयांनी अर्ज दाखल केला आहे.

युवा नेते संभाजी शेठ पाटील यांनी विट्यात जोरदार एन्ट्री केली आहे. आपला उमेदवारी अर्ज दाखल करून संभाजी शेठ पाटील यांनी आमदारकीसाठी रणसिंग फुंकले आहे. पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हलगीच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज चौक संभाजी शेठ पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय