रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्ट्यांची यादी आधीच जाहीर केली आहे. परंतु काही वेळा सण किंवा इतर कारणांमुळे आधीच ठरलेल्या सुट्टीच्या तारखा बदलू शकतात. 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान दिवाळीच्या गोंधळा मुळे या वेळी देशातील अनेक लोक 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करत आहेत तर काही ठिकाणी 1 नो व्हेंबरला दिवाळी साजरी केली जात आहे.लोक 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर या दोन्ही दिवशी दिवाळी साजरी करणार आहेत.
परंतु कॅलेंडरनुसार दिवाळी 31 ऑक्टोबरला आहे आणि ही तारीख लक्ष्मी पूजनासाठी शुभ आहे. बँकांच्या सुट्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर या दोन्ही दिवशी बँका बंद राहणार आहेत.परंतु ही सुट्टी देशभरातील सर्व बँकांसाठी नाही . विविध राज्यांमध्ये बँकांना वेगवेगळ्या दिवशी सुट्टी असणार आहे.