माजी मंत्री बबन घोलप यांनी शिंदे गटाला रामराम करत पुन्हा उद्धव ठाकरे गटात घरवापसी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बबन घोलप यांचा पक्षप्रवेश पार पडला. गेल्या काही दिवसांपूर्वीच बबन घोलप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, बबन घोलप यांचा पुत्र आणि माजी आमदार योगेश घोलप यांना ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून योगेश घोलप यांना नाशिक देवळाली या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बबन घोलप निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज होते. ६ एप्रिल रोडजी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत बबन घोलप यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या मुलाने ठाकरे गटातच राहणं पसंत केलं होते. लोकसभेच्या वेळी बबन घोलप यांनी शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा, तर योगेश घोलप यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार केला असल्याचे पाहायला मिळाले होते.
Related Posts
सांगोल्याच्या राजकारणास नवे वळण! शेकापच्या बालेकिल्ल्यावर ठाकरे गटाचा दावा
सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गणपतराव देशमुख यांनी दोन निवडणूक वगळता या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.…
अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
भाजप आणि शिंदे गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आल्यानंतर आज 23 ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची…
मी तुझ्या कामाकरीता नाही आलो, माझ्या कामासाठी आलोय; अजितदादा कुणाला म्हणाले असं?
विधानसभा निवडणुकीची रणसंग्राम सुरू आहे. दिवाळीतही नेते मंडळी गावागावात जाऊन सणाच्या निमित्ताने मतदारांशी हितगुज साधत आहेत. मतदारांना निवडणुकीत त्यांच्या पक्षाला…