लेंगरे जिल्हा परिषद गटातील बहुतांश गावात टेंभू योजनेचे आणण्यात स्वर्गीय अनिल भाऊंना यश आले आहे. आता वंचित गावांचा देखील सहाव्या टप्प्यात समावेश झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील सर्व गावे टेंभू योजनेच्या पाण्याने ओलिसाखाली येणार आहेत. पाणी आल्यामुळे त्या परिसराचा शेती क्षेत्राचा विकास झाला रस्ते देखील सुसज्ज झाले. या परिसरातील सर्व गावांचा विकास आराखडा बनवून त्यावर मी लक्ष केंद्रित करणार असल्याचे प्रतिपादन महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनी केले.
सुहास बाबर म्हणाले, लेंगरे जिल्हा परिषद गटाने स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या राजकीय वाटचालीस मोलाचा वाटा उचलला आहे. या जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांनी आम्हाला नेहमी सहकार्याची भावना ठेवली आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद गटात येणाऱ्या सर्व गावांचा समतोल विकास साधण्याचा मी प्रयत्न करणार असून सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन सुहास बाबर यांनी केले.