खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 19 उमेदवारांचे 19 उमेदवारी अर्ज विटा तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम सिंह बांदल यांच्याकडे दाखल केले त्यामुळे 29 उमेदवार यांचे 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 22 ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला असून एकूण 49 उमेदवारांसाठी 108 उमेदवारी अर्ज यांची विक्री झालेली होती. अखेर 30 उमेदवारांचे 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी 30 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.