आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी कालचा एकच दिवस होता. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघांमध्ये नेतेमंडळींची उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. माजी पाणीपुरवठा सभापती संजय तेलनाडे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र महाविकास आघडीच्या माध्यमातून मदन कारंडे यांचे नाव निश्चित झाल्यावर वरिष्ठांचा आदेश मानत त्यांनी मदन कारंडे यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले.
महाविकास आघाडीचे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मदन कारंडे यांना बिनिशन पाठिंबा देत आपण निवडणूक लढणार नाही अशी भूमिका माजी पाणीपुरवठा सभापती संजय तेलनाडे यांनी घेतलेली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सागर चाळके,प्रकाश मोरबाळे,शशांक बावचकर यांच्यासह मदन कारंडे यांनी तेलनाडे यांच्या निवासस्थानी सौ स्मिता तेलनाडे यांची भेट घेतली. यावेळी सौ. तेलनाडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना पाठिंबा जाहीर केला.