इचलकरंजीत सोमवारी भव्य मोर्चा!

इचलकरंजी शहरातील शांतीनगर येथील इचलकरंजी अॅग्रो फुडस् अॅन्ड ग्यामा एन्टरप्रायझेस या कत्तलखान्याकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच कत्तलखान्याचे रक्त आणि मांस मिश्रीत सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते. हे पाणी पंचगंगा नदीत मिसळते या पाण्यात विषारी घटक असल्याने महानगरपालीका व इतर जवळच्या गांवातील नागरीकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. आपल्या इचलकरंजी शहराला पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तश्यातच आपली पंचगंगा नदी वेगवेगळ्या कारणांनी दुषित झाली आहे. त्यापैकी मुख्य कारण म्हणजे आपल्या इचलकरंजीमध्ये राजरोसपणे सुरु असलेला कत्तलखाना.

सदर कत्तलखान्या मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल होते व त्यातील सांडपाणी विनाप्रक्रिया थेट ओढ्यामध्ये सोडले जाते हे पाणी रक्त व मांस मिश्रीत असून तेच पाणी पंचगंगा नदी मध्ये मिसळत आहे. आणि त्यामुळे रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. २०१३ साली आपल्या शहराला नदीतील पाणी प्रदुषणामुळे काविळीची लागण झाली होती त्यावेळी काही जनांना आपले प्राण गमवावे लागले व कित्तेकांना याची लागण झाली. आज सुध्दा या घटनेमुळे इचलकरंजी शहराला मोठा धोका निर्माण झाला आहे. सदराचा धोका लक्षात घेऊन समस्त हिंदूत्वनिष्ठ संघटना इचलकरंजी यांच्यावतीने सदर कत्तलखाना जो महापालिकेच्या जागेत आहे तो कायमस्वरूपी बंद होणेसाठी प्रचंड जनसंखेच्या मोर्चाने मा. प्रांताधिकारीसो यांना निवेदन देण्याचे निश्चित केले आहे. इचलकरंजी मधील सर्व हिंदू बंधू- भगिनी यांचेसह सर्व हिंदूत्वनिष्ठ संघटनांनी प्रचंड बहूसंख्येने सदर मोर्च्यामध्ये हजर रहाणेचे आहे.

वेळ व दिनांक : सोमवार २६ फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी ११ वाजता
मोर्चाचा मार्ग : प्रारंभ शिवतिर्थ जवळ जयहिंद मंडळ- जनता बँक-प्रांत कार्यालय, इचलकरंजी. जि. कोल्हापूर.