आष्ट्यात माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या डिजिटलची रंगू लागली चर्चा

इस्लामपूर मतदारसंघात गेली सात विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना विशेषतः भाजपा नेत्यांकडून घेरण्याचा प्रयत्न अनेकदा झालेला आहे. यावेळी मात्र वस्ताद शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे इस्लामपूर मतदारसंघाची जबाबदारी आले. जयंत पाटील यांच्याच विरोधात राष्ट्रवादी पक्षातून भाजपामध्ये आलेले निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन अजित पवार यांनी खेळी केली आहे.

सध्या सोशल मीडियावर जयंत पाटील, अजित पवार व निशिकांत पाटील यांनी एकमेकांना ट्रोल करण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच यांचे कार्यकर्ते जोमाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. अशातच आष्टा शहरातील डिजिटल बोर्डची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आष्टा शहरातील गणपती रोडवरील जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी इथे माननीय जयंत पाटील साहेबांचे कट्टर समर्थक राहतात. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला येऊन वेळ वाया घालवू नये असा बोर्ड लावल्याने या डिजिटल बोर्डची गावात चर्चा सुरू आहे. त्यामुळे या परिसरात विरोधक प्रचाराला येणार का? याचीही सध्या चर्चा रंगू लागलेली आहे.