हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील धनगरमाळ परिसरातील भाडरे यांच्या खोलीत गणेश घोडके याच्या सांगण्यावरुन तीनपानी जुगार चालू असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री छापा टाकला. त्यावेळी राहुल सुखदेव कोळी ( वय ३२ रा. क्रांतीवीरनगर), सचिन शिवाजी तांबेकर ( वय ३० रा. शिवाजीनगर), रोहित मारुती ठोमके (वय ३३), असिफ अब्दुल मुजावर (वय ३०), गणेश विलास बडवे, संजय लक्ष्मण जाधव (वय ५०), बाबासाहेब खुदबुद्दीन चांदकोटी (वय ५८), शिवाजी धोंडीराम पवार (वय ३४ सर्व रा. धनगरमाळ), सागर बाळासाहेब डोळी (रा. लोकमान्यनगर) आणि गणेश घोडके (रा. कोरोची) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत. या कारवाईत रोख ७८ हजा रुपये, १ लाख २० हजाराच्या दोन मोटरसायकली आणि ६५ हजार रुपयांचे ५ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धनगरमाळ कोरोची येथे एका खोलीत सुरु असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. तर ७८ हजाराची रोकड, १.२० लाखाच्या दोन दुचाकी आणि ६५ हजाराचे ५ मोबाईल असा १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस अंमलदार असिफ महमद कलायगार यांनी फिर्याद दिली आहे.