सांगोला, शहरातील बसस्थानक नजीक असणाऱ्या पेट्रोल पंपा समोर एका अंडा बुर्जीच्या गाड्यावर बेकायदेशीर देशी दारूची विक्री करणाऱ्या विरोधात, सांगोला पोलिसांनी कारवाई करत सुमारे १ हजार ५० रुपये किंमतीच्या ३० दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दिनांक १० जून रोजी पोलीस हवालदार बापुराव झोळ यांनी कामगार प्रमोद मासाजी उबाळे रा. अलराई नगर, सांगोला व मालक सुनिल काशिनाथ काटे रा. शिवाजी नगर, सांगोला अशा दोघांविरोधात फिर्याद दिली आहे. १० जून रोजी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी कारवाई करत, त्यास घराडा घालून जागीच पकडले.
