खानापूर विधानसभा मतदारसंघात ३५ उमेदवारी अर्ज पात्र

खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी 29 उमेदवारांचे 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. काल सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार योगेश्वरी टोपे यांची उपस्थितीत छाननी प्रक्रिया झाली. या छाननीय प्रक्रियेत नारायण खर्जे आणि प्रल्हाद गुजले या दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले. त्यामुळे एकूण 28 उमेदवारांचे 25 उमेदवारी अर्ज पात्र ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सोमवार दिनांक ४नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे चार नोव्हेंबर नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.