कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ म्हणून सध्याचा हातकणंगले आणि पूर्वीचा वडगाव मतदारसंघ ओळखला जातो. सलग 5 वेळा वडगाव विधानसभेचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असलेले जयवंतराव आवळे यांनी केलं. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे राजू किसनराव आवळे यांनी जयवंतराव आवळे यांची विजयी घोडदौड रोखली. 2019 च्या विधानससभेत जयवंतराव आवळे यांचे सुपुत्र राजू बाबा आवळे यांनी काँग्रेसकडून विजय मिळवत, यंदाही काँग्रेसकडून या मतदारसंघात प्रमुख दावेदार असणार आहेत.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून राजूबाबा आवळे दावेदार असणार आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुजित मिणचेकर तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोक माने या दोघांची उमेदवारी अद्याप निश्चित झाली नाही. हे संभाव्य उमेदवार आहेत. राजूबाबा आवळे यांची उमेदवाराची ही २ री लढत आहे. हातकणंगले तालुक्यातील युवकांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे