लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना पाठींबा दिला होता. या निवडणुकीत विशाल पाटील विजयी झाले. पण त्यांनी जिल्हयातील एकाही विधानसभा मतदारसंघात वंचितला पाठींबा न दिल्याने वंचितचे खानापूर आटपाडी मतदारसंघातील उमेदवार संग्राम माने यांनी विशाल पाटील सरड्यासारखा रंग बदलू नका अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
