ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर भडकून अभिषेक म्हणाला, ‘माझं दुसरं लग्न..’

गेल्या काही दिवसांपासून अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. या दोघांनी ‘दसवी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना आऱाध्या ही मुलगी आहे.अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा काही नवीन नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून सतत या दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मात्र बच्चन कुटुंबीयांपासून ऐश्वर्याचं दूर राहणं पाहून नेटकरी विविध शक्यता वर्तवत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातही अभिषेक त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत पोहोचला होता. मात्र फक्त ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या वेगळ्या आल्या होत्या. यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली. याआधी 2014 मध्येही या दोघांच्या नात्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. त्यावेळी अभिषेकने ट्विटरवर पोस्ट लिहित संतप्त प्रतिक्रिया दिली होती.2014 मध्ये  अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा होत्या.

या चर्चांना वैतागून अखेर अभिषेकने ट्विटरवर पोस्ट लिहिली होती. या पोस्टद्वारे त्याने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. अभिषेकने लिहिलं होतं, ‘ओके.. तर माझा घटस्फोट होत आहे. मला सांगण्यासाठी धन्यवाद. तुम्ही मला सांगू शकता का की माझं दुसरं लग्न कधी होईल? धन्यवाद!’ त्यावेळी अभिषेकच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.