इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील व महायुतीचे निशिकांत पाटील यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे. येथे प्रमुख पक्षाच्या कोणीही बंडखोरी केलेली नाही. त्यामुळे एकास एक लढत करण्यात महायुतीला यश आले आहे. अर्ज दाखल केलेल्या २१ उमेदवारांपैकी ९ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, शिवसेना शिंदे गटाचे सागर मलगुंडे, मराठा क्रांती मोर्चाचे बी. जी. पाटील, दिग्विजय पाटील, हणमंत पाटील, अपक्ष विनायक शेवाळे, चंद्रशेखर तांदळे, जगन्नाथ मोरे, दत्तात्रय गावडे पार्टी- शरदचंद्र पवार), निशिकांत प्रकाश पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), राजेश शिवाजी गायगवळे (वंचित बहुजन आघाडी), सतीश शिवाजी इदाते (राष्ट्रीय समाज पक्ष), अमोल विलास कांबळे (बहुजन समाज पार्टी), अमोल आनंदराव पाटील (अपक्ष), किरण संपतराव पाटील (अपक्ष), जयंत रामचंद्र पाटील (अपक्ष), जयंत राजाराम पाटील (अपक्ष), निशिकांत दिलीप पाटील (अपक्ष), निशिकांत प्रल्हाद पाटील (अपक्ष), गुणवंत रामचंद्र देशमुख (अपक्ष) हे १२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील व महायुतीचे उमेदवार निशिकांत पाटील या दोघांच्या नावाशी साम्य असलेले अन्य २-२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विरोधी उमेदवारांची मते कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून हा डाव खेळला गेल्याची चर्चा आहे.
Related Posts
इस्लामपूर साखराळेत राष्ट्रवादीची बैठक…..
महात्मा गांधी हे त्याच्यावर चित्रपट काढल्याने जगाला कळाले असे देशाच्या पंतप्रधानांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष…
घट्टे ट्रस्टला इंद्राणी बालन फाऊंडेशनकडून रुग्णवाहिका भेट!
सामाजिक क्षेत्रात काम करणार्या इस्लामपूर येथील डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टला पुण्यातील ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट देण्यात आली.या…
मविआला ताकद द्या आमदार जयंत पाटील यांचे आवाहन….
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रचार सभेचा ओघ लागलेला पाहायला मिळत आहे. अशातच कवठेपिरान येथे आमदार जयंत पाटील यांची…