सांगली-मिरजेसह जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह बंडखोर, अपक्षांनी प्रचाराचे नारळ फोडले. जाहीर प्रचारासाठी 13 दिवसांचा कालावधी असल्याने आता मतदारांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी नियोजन केले आहे. बैठका, जाहीर सभा, कोपरा सभांचे नियोजन करण्यात येत असून येत्या दोन दिवसांमध्ये राजकीय वातावरणही चांगलेच तापणार आहे. इस्लामपूर विधानसभेचे उमेदवार मा जयंतराव पाटील साहेब यांच्या प्रचारासाठी आष्टा शहरात आज बैठका व पायी प्रचार दौरा राजारामबापू कारखान्याचे चेअरमन युवा नेते प्रतीक दादा पाटील व आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव दादा शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी 6:00 वाजता चांदोली वसाहत येथील निनाई अधिष्ठा मंदिरातून पायी प्रचार दौरा तसेच दुपारी 3:00 वाजता कटारे गल्ली, बसुगुडे चौक, तिरंगा चौक, धनाजी दळवी यांच्या घरी बैठका होणार आहेत. यावेळी सर्व कार्यकर्ते बूथ अध्यक्ष, सचिव व प्रमुख पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विराज दादा शिंदे यांनी केले आहे