विसापूर सर्कलचे सर्व प्रश्न सोडविणार सुहासभैया बाबर यांची ग्वाही…

खानापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहासभैया बाबर यांनी विसापूर सर्कलमधील कचरेवाडी, मोराळे, नरसेवाडी, पेड,धोंडेवाडी, हातनुर, विजयनगर, गोटेवाडी, किंदरवाडी, मांजर्डे या गावांचा प्रचार दौरा केला. विसापूर सर्कल मधील सर्व गावांचा समतोल विकास करण्याचे काम स्व. आमदार अनिल भाऊंनी केले होते. तोच आदर्श समोर ठेवून भविष्यात या परिसरातील विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. स्व. अनिल भाऊंना आपल्या परिसराने दहा वर्षे मोलाची साथ दिली त्याप्रमाणे मलाही आशीर्वाद द्यावा असे आवाहन यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास भैया बाबर यांनी केले.

यावेळी विसापूर सर्कल मधील सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. टेंभू चा सहावा टप्पा होत असताना विसापूर सर्कल मधील सर्व गावांना पाणी जाणार आहे. विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी आपण सर्वांनी मला साथ द्या असे आवाहनही यावेळी बाबर यांनी केले.