आटपाडी आगाराच्या बस वायफळे येथे अडवण्याचा इशारा…

तासगाव तालुक्यातील बिरणवाडी येथील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी वायफळे येथील बाळासाहेब देसाई हायस्कूल या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि शनिवारी या विद्यार्थिनी सकाळी लवकर शाळेला आलेल्या होत्या शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांनी वायफळे येथील बस स्टॉप वर बिरणवाडी या आपल्या गावी जाण्यासाठी थांबलेल्या होत्या. विद्यार्थिनी या सकाळपासून उपाशी होत्या त्या विद्यार्थिनींना आटपाडी आगाराच्या बसशिवाय दुसरी कोणतीही बस नाही त्यामुळे त्या बसची वाट पाहत थांबलेल्या होत्या.

आटपाडी आगाराची आटपाडी इचलकरंजी बस क्रमांक एम. एच. 20 बी. एल 1369 ही बस सकाळी सव्वा अकरा वाजता वायफळे येथील स्टॉप वर आली. या स्टॉप वर बिरणवाडी येथील 15 ते 20 विद्यार्थिनी सोबतच अन्य काही प्रवासी व तासगावला महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी उभे होते. चालकांनी बस थांबवली त्यावेळी वायफळे स्टॉप वर उभे असणारे विद्यार्थी तसेच अन्य प्रवासी या बसमध्ये बसू लागले. मात्र चालकाने थांबवलेली बस वाहक डी.बी नवले यांनी हलवायला लावली.

बस मध्ये जागा असताना देखील वाहकाने थांबलेली बस तासगावच्या दिशेने नेण्याची सूचना चालकाला केली. त्यामुळे त्याच्या विषयी तक्रार केलेली आहे. याप्रकरणी नवले यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील होत आहे. कारवाई न झाल्यास वायफळे येथे आटपाडी आगाराच्या बस अडविण्याचा इशारा देण्यात आला आहे.