सुप्रिया सुळेंची संस्था दरवर्षी २५० मुलांना शिष्यवृत्ती देते, कधीच जाहिरातबाजी केली नाही; शरद पवार

दौंड येथे अनंतराव पवार इंग्रजी शाळेचा नूतन वास्तू उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रवादी कोणाची यावरून दोन गटामध्ये वाद असताना सर्व नेते एकत्र आल्याने चचाना तोंड फुटले होते. शरद पवार यांनी कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, १९७२ साली संस्था काइली सध्या संस्थेत ३२ हजार विद्यार्थी आहेत. त्यातील १५ हजार मुली आहेत.

संस्थेचे अनेक वसतिगृह आहेत. शाळेतील मुले जगाच्या पाठीवर जाऊन नाव कमावत आहेत. विदेशात ते अभिमानाने सांगतात की, आम्ही व्हीपीच विद्यार्थी आहोत. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल काम करत आहेत. कृत्रिम बुद्धीमुळे सर्व क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. तुमच्या उसामध्ये किती साखर आहे. त्याची तोडणी कधी करायची हे सर्व एआय सांगू शकेल. शेतीवर येणाऱ्या संकटाची माहिती देखील एआयच्या माध्यमातून दिली जाते. अशाप्रकारचा एक विभाग आपण संस्थेमध्ये सुरु केला आहे.

मला खात्री आहे की दोन्ही संस्था त्या दृष्टीने काम करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तात्यासाहेबांनी उमेदीच्या काळात मुंबई गाठली आणि की शांताराम यांच्यासोबत काम केलं. पुढे आम्हीच त्यांना कुटुंबाची शेती यासाठी माघारी बारामतीला बोलावलं. माझ्या पश्चात आप्पासाहेब आणि तात्यासाहेबांनी बारामतीत शेती आणि शिक्षणाची जबाबदारी सांभाळली. माझ्या निवडणुकीची जबाबदारी देखील तात्यासाहेबांनी व्यवस्थित सांभाळली हे कधीच विसरणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

साधणार कोण दोन्ही गटापुढे गर्दी जमविण्याचे आव्हान २६ व्या वर्षी मी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी उभा ठाकलो होते. त्यावेळी माझ्याविरोधात एका साखर कारखान्याने जोर लावला होता. त्यामुळे सोपी पण काहीच्या मदतीने मी मोठ्या मतांनी विजयी झालो. यावेळी तात्यासाहेबांनी आणि आप्पासाहेबांनी मला पाठिंबा दिला. त्यांची मदत मी कधी विसरु शकत नाही, असे ते यावेळी माने शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असंही ते म्हणाले. शरद पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांचे जाहीर कौतुक करण्यात आले. ते म्हणाले की सुप्रिया सुळे यांची संस्था र २५० मुलांना शिष्यवृत्ती देते है करत असताना त्यांनी कधीच स्वतःचा विचार केला नाही. आम्ही कधीच याची जाहिरातबाजी केली नाही, असे ते म्हणाले.