सद्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागून राहिलेले आहे. एक पक्षातून अनेक सभा, मेळावे यांचे आयोजन देखील केले जात आहे.नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाची तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक हातकणंगले येथे पार पडली. राज्याचे राजकारण धर्म, जात व भावनिक आधारावर चालू आहे. शेतकरी शेतमजूर, कामगार, विद्यार्थी यांच्या प्रश्नाकडे कोणीही बघायला तयार नाही. महागाईवर कोणीही बोलायला तयार नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनाच एकमेव या प्रश्नाच्या साठी आवाज उठवत आहे. सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेमध्ये मांडण्यासाठी हातकणंगलेचा आमदार स्वाभिमानीचाच झाला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.