सुहास भैयाना विटा शहरातून मताधिक्य देऊन महायुतीचा आमदार करणार

विटा शहराला घोगाव येथून पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना भाजप सेना युतीच्या काळात झाल्या आहेत. स्वर्गिय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी तर शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात सुहासभैया बाबर व अमोलदादा बाबर यांनीही आपल्या सरकारच्या माध्यमातून प्रचंड कामे केली आहेत त्यासाठी विटा शहरातून यावेळेस महायुतीला मताधिक्य देऊ असे अभिवचन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अनिल म. बाबर यांनी दिले.

विटा येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारफेरीवेळी अनिल म. बाबर बोलत होते. यावेळी सोहम जाधव, कुमार लोटके, मनोज खारगे,संजय टकले ,धनंजय कवडे, अशोक वरुडे, अभिषेक तारळेकर,संजय तारळेकर, अनिल चोथे, आदी मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी टेंभू योजनेच्या माध्यमातून विटा शहराच्य शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केला. त्यातून आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला. शहरातील पायाभूत सुविधा देण्यात आपल्या सरकारच्या माध्यमातून अनिलभाऊंना यश आले.

भविष्यात आपण सुहास भैयांच्या रुपाने महायुतीचा आमदार विजयी करा. त्यांच्या माध्यमातुन विटा शहराचा कायापालट होईल. त्यामुळे महायुतीला साथ द्या आणि विटा शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊया असे आवाहनही बाबर यांनी केले.