शेतकरी कामगार पक्षाचे सध्याचे नेतृत्व विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. सांगोला शहरातील चिंचोली रोडवरील खंडागळे वस्ती येथे शेकापला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत मशाल हाती घेतली आहे.
शेतकरी कामगार पक्षातील मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला शहरातील चिंचोली रोडवरील खंडागळे वस्ती येथील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील शेकडो कार्यकर्ते दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.
या पक्ष प्रवेशामुळे शेकापला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत मशाल हाती घेतली आहे. सांगोला शहरातील चिंचोली रोडवरील खंडागळे वस्ती येथील राजाराम जगन्नाथ खंडागळे, अमोल खंडागळे, सुरेश खंडागळे, शंकर खंडागळे, रामा खंडागळे, योगेश खंडागळे, सुनंदा खंडागळे, कोमल खंडागळे, कांचन खंडागळे, शिवनंदा खंडागळे, सविता खंडागळे, आबासो खंडागळे, स्वप्निल पारसे, तात्यासो बेहरे, आशिष खंडागळे, अनिल खंडागळे, शुभम खंडागळे, स्वराज खंडागळे, शिवतेज खंडागळे, साहिल माने या कार्यकर्त्यांनी शेकापला रामराम करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी जेष्ठ नेते तानाजीकाका पाटील, दिलीप मस्के यांच्यासह शिवसेनेचे, पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.