इंटरनेट क्षेत्रात भारताच्या वेगवान हालचाली, कधीपासून मिळणार देशात 6G सेवा, असा आहे प्लॅन

मल्टी-पोर्ट स्विच सिंगल ब्रॉडबँड तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच अँटेनामधून सर्व बँड चालवण्याचा सरकारचा विचार आहे. आतापर्यंत नेटवर्कच्या वेगवेगळ्या बँडमध्ये वेगवेगळे अँटेना लागतात.सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR), दूरसंचार विभाग (DoT) चे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) संयुक्तपणे हा अँटेना विकसित करत आहेत. या सिंगल बँड अँटेनासाठी मल्टीपोर्ट स्विच विकसित केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6G व्हिजनच्या अनुषंगाने काम सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. मायक्रो-इलेक्ट्रोमेकॅनिकल तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पामध्ये अँटेना चांगल्या कामगिरीसह एकाच वेळी अनेक बँड कव्हर करणार आहे.दूरसंचार विभाग 6G संशोधनासाठी दोन नेक्स्ट जनरेशन टेस्टबेडसाठी निधीही देत आहे.

यासह 6G साठी सरकारकडे आलेल्या 470 प्रस्तावांवर विचार करत आहे. भारत 2030 पर्यंत 6G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक मोठी शक्ती बनले पाहिजे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.भारत 6G पेटंट फाइलिंगमध्ये जगात आघाडीवर आहे. देशात 5G वेगाने लागू झाला. त्यानंतर आता 6G संशोधनातही प्रगती करत आहे. सरकारी पॅनेलनुसार पुढील तीन वर्षांत, भारता 6G पेटंटचा 10% मिळवणे अपेक्षित आहे.