शहरातील उर्वरित झोपडपट्टीचे पुनर्वसन करून सध्याच्या जागेवरच म्हाडा तर्फे पक्की घरे बांधण्यात येणार आहेत. खास. धैर्यशील माने, सुरेशराव हाळवणकर, आम. प्रकाश आवाडे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांना सोबत घेऊनच पुनर्वसनाचा प्रकल्प राबवण्यास आपण कटिबद्ध आहोत. झोपडपट्टी भागातल्या जनतेचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप मूल्यवान आहेत. आपले पाठबळ आपल्या सगळ्यांच्या विकासासाठी मिळावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी केले. प्रभाग १२ मध्ये खास. धैर्यशील माने, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांच्या विकास निधीचा उपयोग झोपडपट्टी भागासाठी केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीतून मी निवडणूक रिंगणात आहे. असे स्पष्ट करून राहुल आवाडे म्हणाले, की यापूर्वी जयभीम नगर, लाल नगर, साईड क्रमांक १०२, इंदिरानगर या भागात झोपडपट्टीचे पुनर्वसन झाले आहे. आता उर्वरित झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यास आपण कटिबद्ध आहे.
मा.उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा पुनर्वसनाचा प्रकल्प राबवला जाणार आहे. प्रस्ताविक भाषणात रवी रजपुते म्हणाले, रेणुका नगर, धारवड, नमाजगे माळ आपल्या झोपडपट्टी भागात औद्योगिक वसाहत येत असल्याने व्यायामशाळा व सांस्कृतीक भवनासाठी जागा नाही. आम्ही सर्व झोपडपट्टी धारकांनी बहुमताने निवडून दिल्यावर आम्हास जागा उपलब्ध करून सांस्कृतिक हॉल आणि व्यायामशाळा बांधून द्यावी अशी मागणी मा. उपनगराध्यक्ष रवी रजपुते व युवा नेते झाकीर जमादार यांनी केली. यावेळी विलासमामा गाताडे, युवा नेते झाकीर जमादार, भाऊसो आवळे, सौ. गीता जगताप, नरेश नगरकर, सौ. संगीता कांबळे, नारायण येरगुटला, श्रीनिवास फुलपाटील, शशिकांत कांबळे, शेवटी रोहित रवी रजपुतेंनी आभार मानले. यावेळी झोपडपट्टीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.