ही केवळ विधानसभेची निवडणूक नसून विचारांची लढाई आहे. हे राज्य आपण कोणाच्या हातात देणार ? याचा निर्णय आपणास घ्यायचा आहे. बहुजन समाजाचे हित आणि महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी महाविकास आघाडीस ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांनी केले. कवठेपिरान येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सचिन पाटील, रोहित साळुंखे व अनिकेत वडगावे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी पै. विनोद वडगावे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतिश पाटील, संजय कांबळे, राजेंद्र तामगावे, प्रकाश सावर्डे, बबन येवले, संग्राम जाखलेकर, सर्वोदय पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब मडके, दादासाहेब मडके, शामराव पाटील, संदीप पाटील, तानाजी पाटील, कपिल किर्ते, बाबुराव पाटील, डॉ. जयपाल तामगावे, महादेव पाटील, रमेश पाटील, सुरेश सरडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Related Posts
मा.आम.जयंत पाटील यांची नवी खेळी! कितपत ठरणार यशस्वी?
सांगली मिरज कुपवाड महापालिकेत जयंत पाटील यांची काँग्रेसपेक्षा अधिक ताकद आहे. वेळोवेळी त्यांनी ती दाखवूनही दिलेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार…
आ. जयंत पाटील यांच्या प्रचारासाठी प्रतीक पाटील यांच्या मॅरेथॉन बैठका! कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
18 तारखेला प्रचाराचा अवधी संपत असून त्याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरात महायुती आणि मविआच्या नेत्यांनी प्रचाराचा, सभांचा धडाका…
इस्लामपूर मतदारसंघात महायुती, मविआत….
विधानसभा निवडणूक अवघ्या महिन्यावर आली असल्याने आचारसंहितेची लगबग देखील सुरू आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या चर्चा…