आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्या कारणाने प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रचारांचा धुरळा सुरू आहे. हातकणंगले मतदारसंघात १६ उमेदवार असले तरी मुख्य लढत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार राजू जयवंतराव आवळे, महायुती कडून जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने आणि परिवर्तन महाशक्ती चे स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून डॉ. सुजित मिणचेकर यांच्यातच सामना रंगणार आहे. आमदार राजू आवळे यांनी विकासकामांसाठी प्राधान्याने निधी दिला, विकासासाठी पाठपुरावा केला, कोणताही पक्षीय अथवा गट-तट हा भेदभाव केला नाही. त्यामुळे त्यांच्या विजयाची जबाबदारी मतदारांनी हाती घेतली असल्याचे नगराध्यक्षा अर्चना जानवेकर यांनी सांगितले.त्या महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजू आवळे यांच्या पदयात्रेप्रसंगी बोलत होत्या.
आमदार आवळे म्हणाले, ‘हातकणंगलेच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. माझ्या पाठीशी ग्रामस्थांनी सतत पाठबळ उभा करून मला प्रेरणा दिली आहे. या निवडणुकीत पुन्हा आपल्या पाठबळावर माझा विजय होईल.’ गिरीश इंगवले म्हणाले, ‘युवकांना सोबत घेत विविध उपक्रम राबवून विधायक विकास साधण्यासाठी आमदार आवळे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
हातकणंगले परिसरातून त्यांना मताधिक्य देण्याचा निर्धार युवकांनी केला आहे.’ बाळासाहेब वरूटे, नूरमहंमद मुजावर, सुरेश खोत, दीपक वाडकर, विश्वास कोळी, शिवाजी इंगवले, अजित मोरे, अभिजित इंगवले, राजू नलवडे, समीर शेख, प्रकाश खांडेकर, विजय चौगुले, अभिजित पाटील उपस्थित होते.