गोपाळ समाजाच्या मंदिरासाठी निधी कमी पडू देणार नाही : खवरे

गोपाळ समाज अत्यंत प्रामाणिक व कष्टाळू आहे. त्यांचे सर्व समाजातील लोकांबरोबर अत्यंत आपुलकीचे संबंध आहेत. पुलाची शिरोली येथील गोपाळ समाजाच्या मंदिर बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही माजी सरपंच शशिकांत खवरे यांनी दिली. वीर सावरकर नगर येथील काळूबाई मंदिर बांधकामाचा शुभारंभ झाला. गोपाळ समाजाने दैवत असलेल्या काळूबाई मंदिराचे लोक वर्गणीतून बांधकाम सुरू आहे.

या मंदिरासाठी शशिकांत खवरे यांनी आर्थिक पाठबळ दिले आहे. तसेच गावातील अन्य व्यक्तींनीही देणगी स्वरुपात सहकार्य केले आहे. यापुढेही सहकार्य राहिल. सर्व समाजाचे गोपाळ समाजातील लोकांबरोबर अत्यंत आपुलकीचे संबंध आहेत. त्यामुळे बांधकामासाठी सर्वांनी सहकार्य करावे. याप्रसंगी अपील सावंत, मन्सूर नदाफ, अतुल शिंदे, काँग्रेसचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, प्रकाश कौंदाडे आदींसह नागरिक उपस्थित होते.