आमदार अनिल बाबर आपल्यातून निघून गेले आहेत, असे मी म्हणणार नाही. विचाराने ते आपल्यासमवेतच आहेत. हे सगळे चेहरे दिवंगत अनिल बाबर यांचेच आहेत आणि सगळ्यात मोठा चेहरा सुहास बाबर यांच्या रुपाने आपण निवडणुकीसाठी उभा केला आहे. सर्वांच्या आशीर्वादाने गुलाल आपलाच आहे असा विश्वास संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा डॉ. शीतल बाबर यांनी व्यक्त केला.
खानापूर, आटपाडी, विसापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ डॉ. बाबर यांनी आळसंद परिसरात झंझावाती प्रचार दौरा केला, त्या वेळी त्या बोलत होत्या. त्यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.डॉ. बाबर म्हणाल्या, मी अनिल बाबर यांच्या घरातली असल्यामुळे त्यांच्या कामाबद्दल ऐकलं होतं. मात्र आज प्रचारानिमित्ताने बाहेर पडल्यानंतर त्यांनी केलेले काम पाहता अनिल बाबर हे नाव नाही, तर खूप मोठा विचार आहे, याची जाणीव झाली. त्यामुळेच या निवडणुकीत आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे.
या रणधुमाळीत घरोघरी, दारोदारी केवळ सुहास बाबर यांचेच नाव आहे. मतदारसंघाला दिवंगत अनिल बाबर यांनी पाणी दिल्याने हिरवळ तर आलेलीच आहे. शेतीमधून उत्पन्न वाढून पैसा खळखळला जावा आणि या मतदारसंघाला सुहास बाबर यांच्या माध्यमातून सोनेरी रंगत येईल.