आमदार सुहास भैय्या बाबर आणि आमदार रोहित पाटील यांचा दोस्ताना खूपच गाजावाजा करीत आहे. याची चर्चा सर्वांच्याच मुखी दिसत आहे. रविवारी जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक सुटीच्या दिवशी पार पडली. याला आमदारांनी शंभर टक्के हजेरी लावली. मात्र, या सर्वांमध्ये राजकारणातील एक अनोखी दोस्ती लक्षवेधी ठरली. आमदार रोहित पाटील व आमदार सुहास बाबर यांनी एकत्रित सभागृहात प्रवेश केला. सभा संपल्यानंतर एकत्र बाहेर पडले. दिवंगत नेते आर. आर. पाटील व अनिल बाबर यांच्या मैत्रीची आठवण यानिमित्ताने झाली.
