विटा येथे भारतीय जनता पक्षाची बैठक पार पडली. यावेळी बेळगाव दक्षिणचे आमदार व सांगली जिल्ह्याचे प्रभारी अभय पाटील, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, खानापूर विधानसभा मतदारसंघ प्रभारी सुनील हेगडे उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना अधिकाधिक मताधिक्य मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
राज्यात महायुतीच्या सरकारने प्रचंड विकासकामे केली आहेत. ती सर्व विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवा आणि या मतदारसंघातील उमेदवार सुहास बाबर यांना सर्वाधिक मतांनी विजयी करा.भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी ठाम आहे,” असे प्रतिपादन बेळगाव दक्षिणचे आमदार व सांगली जिल्ह्याचे प्रभारी अभय पाटील यांनी केले.
दरम्यान, महायुती सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवून सुहास बाबर यांना बहुमताने निवडून आणण्याचा सर्वांनी निर्धार केला. बैठकीला अनिल म. बाबर, ज्येष्ठ नेते बाबा बर्वे, किशोर डोंबे, सुहास पाटील, विलास काळेबाग, विक्रम भिंगारदेवे, करण जाधव, दत्तात्रय तारळेकर, पंकज नलवडे उपस्थित होते.