आज होणार महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव! कधी आणि कुठे विनामूल्य लाइव्ह पाहता येणार?

आपल्यापैकी बरेचजण हे क्रिकेटचे चाहते आहेत. महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्राचा लिलाव आज म्हणजेच ९ डिसेंबर रोजी होणार आहे. पाच संघ असलेली ही स्पर्धा पहिल्या सत्रात खूप लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर आता दुसऱ्या सत्राकडे वाटचाल करत आहे. पहिल्या सत्रात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती. आता स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातसाठी एकूण १६५ महिला खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत.

विशेष म्हणजे या स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी होत आहेत. २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सत्रातही पाच संघ सहभागी झाले होते. आता पुन्हा एकदा पाच संघ मैदानात उतरतील, ज्यात दिल्ली कॅपिटल्स महिला, यूपी वॉरियर, रॉयल चॅलेंजर्स महिला, गुजरात जायंट्स आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स महिला संघांचा समावेश आहे.

तथापि, पाच संघांकडे बोली लावण्यासाठी फक्त ३० स्लॉट आहेत. १६५ पैकी १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडू आहेत. एकूण खेळाडूंपैकी ५६ कॅप्ड आणि १०९ अनकॅप्ड खेळाडू आहेत, ज्यांच्यासाठी पाच फ्रँचायझींकडे एकूण १७.६५ कोटी रुपये शिल्लक आहेत. आता हा लिलाव केव्हा, कुठे आणि कसा लाइव्ह पाहता येणार याबद्दल जाणून घेऊया.

लिलाव कधी होणार?

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी म्हणजेच डब्ल्यूपीएल २०२४ साठी लिलाव आज, शनिवार, ९ डिसेंबर रोजी होणार आहे.

लिलाव कुठे होणार?

महिला प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव मुंबईत होणार आहे.

टीव्हीवर लाइव्ह कुठे बघता येणार?

महिला प्रीमियर लीग २०२४ साठीचा लिलाव स्पोर्ट्स १८ नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर लाइव्ह प्रसारित केला जाईल.

मोफत लाइव्ह कुठे बघता येणार?

डब्ल्यूपीएल २०२४ चा लिलाव जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटद्वारे विनामूल्य लाइव्ह पाहता येणार आहे.