खानापूर मतदारसंघात अनिलभाऊंचा जनसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी सुहासभैय्या बाबरच खंबीर : राज्यमंत्री शंभूराजे देसाई 

दिघंची, प्रचार सभा आटपाडी खानापूर विसापूर सर्कल विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहासभैय्या अनिलभाऊ बाबर यांच्या प्रचारार्थ काल दिघंची ता. आटपाडी येथे मा. शंभूराजे देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचारसभा पार पडली. या सभेत अमोल मोरे विनोद गुळवणी, बाळासाहेब मोटे, कलाप्पा कुटे, साहेबराव पाटील, साहेबराव चवरे, बापू पूजारी, दत्तात्रय पाटील पंच, सभापती संतोष पुजारी, ब्रह्मदेव होनमाने, श्रीरंग शिंदे, अरविंद चव्हाण, माणिक नष्टे, विष्णू यादव, सुबराव पाटील, सागर ढोले, मुन्नाभाई तांबोळी, बाळासाहेब होनराव, संजय वाघमारे, मोरे उपस्थित होते. यावेळी बोलताना शंभू राजे म्हणाले की स्व. अनिलभाऊ बाबर हे निःस्वार्थ भावनेने, जनसेवेचा वसा घेऊन काम करणारे नेते होते. आमचे ज्येष्ठ सहकारी म्हणून त्यांची आठवण कायम राहील.

अनिलभाऊंच्या शब्दात मोठी ताकद होती. त्यांनी सुचविलेले प्रस्ताव काही मिनिटातच कॅबीनेट मधून मंजूर होत होते. खानापूर मतदारसंघात त्यांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी सुहासभैय्या बाबर यांना खंबीर साथ द्या, सुहास बाबरच मतदार संघातून विक्रमी लीडने विजयी होणार असा विश्वास वेक्त केला. संपूर्ण टेंभू योजनेला स्व. अनिलभाऊ बाबर यांचे नाव देण्यासाठी पुढाकार घेणार आहे, टेंभू योजनेस अनिल बाबर यांचे योगदान आहे. टेंभू च्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी अनिलभाऊ हवे होते अनिल बाबर यांनी स्वतः पेक्षा जनतेच्या कामाला महत्व दिले.टेंभू योजनेचे पाण्याने राजेवाडी सह परिसराचे नंदनवन झाले आहे याचे श्रेय स्वर्गीय अनिलभाऊना जाते टेंभू योजनेच्या सहाव्या टप्याची मंजुरी माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असल्याचे अनिल बाबर यांनी सांगितले होते. दरवर्षी राजेवाडी तलाव जिहे कटापूर व उरमोडी योजनेतून भरून देणार असे वक्तव्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. 

यावेळी बोलताना सुहास बाबर म्हणाले की, पाण्याचा प्रश्न शंभूराजेमुळेच मार्गी लागला आहे आमच्या संकटकाळी शंभू राजेच असतात अनिल भाऊंनी स्वतः च्या नव्हे तर शेतकऱ्याची मुलांची व्यवस्था केली विरोधकंच्या दोन मुलांसाठीच संस्था आहेत गद्दार म्हणणाऱ्यानी पाच पक्ष बदलेले अनिल भाऊनी लाख मोलाची माणसे उभा केली म्हणून ३५ वर्षापासून आजही जनता प्रेम देते आहेत. प्रत्येक सभेला गेल्यावर लोक मला पैसे देतात मी नको म्हणून सांगतो कारण माझ्या दृष्टीने ती खूप मोठी नैतिक जबाबदारी आहे. विरोधकांकडे विकास कामाचा मुद्दाच नसल्याने ते आमच्यावर टीका करून मते मागत आहेत पण राजकारणात संस्कार जपावे लागतात. दिघंचीत ४२ कोटीची अनिलभाऊच्या च्या माध्यमातून कामे झाली आहेत. २ टी एम सी पाण्याने तलाव भरून वाहत आहे. असाच दरवर्षी राजेवाडी तलाव भरून मिळावा पाण्यामुळे डाळिंब व द्राक्षेची १ हजार कोटीची विक्री झाली आहे ऊस उत्पादनही मोठे आहे.