पै. युवराज कामान्ना याची स्कूल नॅशनल स्पर्धेसाठी निवड

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील छत्रपती शिवाजी तालमीचा मल्ल पै. युवराज सिद्ध कामान्ना याने अहिल्यानगर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये ५१ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. त्याची दिल्ली येथे होणाऱ्या स्कूल नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला या स्पर्धेसाठी कुस्ती कोच पै.सोमनाथ कामान्ना यांचे प्रशिक्षण तर आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.