आतापर्यंत आपण जयंत पाटील यांना आमदार करण्यासाठी मतदान केले आहे. आता आपले मत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला करण्याची संधी आली आहे. इस्लामपूर मतदार संघातील जनतेच्या हृदयात जयंत पाटील यांचे नाव आहे. त्यामुळे इस्लामपूरसह राज्यात तुतारी वाजेल. जयंत पाटील यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे त्यामुळे ते निश्चितच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी व्यक्त केला. तर स्व.बाळासाहेब ठाकरे,शरद पवार या मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष फोडण्याचे पाप भाजपाने केले. पक्ष फोडणाऱ्यांचे अन् सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांचा कार्यक्रम करा, असे आवाहन जयंत पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी आष्टा येथे बोलताना केले. महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ आझाद मोहल्ला विलासराव शिंदे नगर मिसळवाडी कदमवेस येथे आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, विराज शिंदे, विशाल शिंदे, दिलीपराव वग्यानी, रघुनाथ जाधव, बबनराव थोटे, व्ही. डी. पाटील, रामचंद्र सिद्ध, माणिक शेळके, संग्राम फडतरे प्रमुख उपस्थित होते.
वैभव शिंदे म्हणाले, स्व. विलासराव शिंदे व जयंत पाटील यांनी आष्टा शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे. मुस्लिम समाजासाठी मोठी घरकुल योजना राबवली. नऊ हौसिंग सोसायटीमध्ये गरजूंना सत्ताविशे घरकुले दिली. रस्ते व गटारींची कामे झाली आहेत. आष्ट्याबरोबरच इस्लामपूर मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम जयंत पाटील यांनी केले आहे. नुकतेच शरद पवार यांनी जयंत पाटील हे मुख्यमंत्री होतील, असे संकेत दिल्याने विरोधकांचे पोटशुळ उठले असून त्यांनी कितीही ताकद लावली तरी देखील जयंत पाटीलच विजयी होणार आहेत. आष्टा शहरातून दहा हजाराचे मताधिक्य देऊ. राजवर्धन पाटील म्हणाले, उभ्या महाराष्ट्राला जयंत पाटील निष्ठा जपणारा नेता म्हणून ओळख आहे. विरोधी उमेदवार यांनी सत्तेसाठी किती पक्ष बदलले हे त्यांनाही माहित नसावे, विरोधक अपप्रचार, दिशाभूल करीत आहेत, त्याला फसू नका. इथल्या जनतेने जयंत पाटील यांना ३५ वर्षे साथ दिली आहे. या पुढील काळात ही अशी द्यावी.यावेळी भाग्यश्री शिंदे, स्नेहा माळी झिनत अत्तार, प्रतिभा पेटारे, उज्वला पाटील, तेजश्री बोन्डे, अर्जुन माने, अमित ढोले, प्रवीण वारे, शकील मुजावर, नूरमहंमद मुल्ला, नूर मुजावर यांच्यासह कार्येकर्ते उपस्थित होते.