विरोधकांच्या खोटेपणाला जनता फसणार नाही; राजवर्धन पाटील

भाजपने महाराष्ट्राचा बिहार केला आहे देशात आपल्या राज्याच्या राजकारणाची खिल्ली उडवली जात आहे. जयंत पाटील यांनी गेल्या दहा-बारा दिवसात राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ६०-७० सभा घेतली आहे. जो पक्ष व चिन्ह आपण घराघरापर्यंत पोहोचलो तोच पक्ष व चिन्ह घेऊन जनतेला फसवण्याचा उद्योग चालू आहे. मात्र आपली सुज्ञ व जागृत जनता त्यात फसणार नाही असे प्रतिपादन युवा नेते राजवर्धन पाटील यांनी केले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ राजवर्धन पाटील यांच्या कोपरा सभा झाल्या. राजवर्धन पाटील म्हणाले, सध्या राज्यात महागाई, बेरोजगारी, शेती मालाचा भाव, महिलांवरील वाढत्या अत्याचार, भ्रष्टाचार आदी प्रश्न मार्गी पडले असून जाती धर्मात भांडणे लावली जात आहेत.

शेतकऱ्यांची कर्जमाफी केली का? मराठा व धनगर समाजाला आरक्षण दिले का? राज्याचा स्वाभिमान आणि गद्दार यांच्यातील ही लढाई आहे महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीरनामा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुले, आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र पुन्हा उभारण्यासाठी महाविकास आघाडीस सत्तेवर बसू या माजी नगराध्यक्ष चिमण डांगे म्हणाले, विरोधक अफवा पसरवीत आहेत त्यांना बळी पडू नका आपल्या नेत्यास राज्याच्या सर्वोच्च पदाची संधी मिळणार आहे काफिल राहू नका इस्लामपूर शहरातून जयंत पाटील यांना मोठे मताधिक्य देऊया.