सत्यजित पाटील यांच्या प्रचार फेरीला नागावात उस्फूर्त प्रतिसाद!

नागाव (ता. हातकणंगले) येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक ९ वाजता नागाव फाटा येथून फेरीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ग्रामदैवत श्री खणाई देवीचे दर्शन घेण्यात आले. त्याचबरोबर समतानगर येथील विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

संपूर्ण गावातून प्रचार फेरी काढून फेरीची सांगता संभाजीनगर येथे करण्यात आली. यावेळी उत्तम सावंत यांनी नागावमधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही दिली. यावेळी काँग्रेस आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार सुजित मिणचेकर, राजीव आवळे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, महेश चव्हाण, शशिकांत खवरे, बाजीराव पाटील, अनिल खवरे, भगवान जाधव, बाजीराव सातपुते आदी उपस्थित होते.