अशोकराव माने यांच्या विजयानंतर कुंभोज येथे आनंदोत्सव साजरा

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. दलित मित्र अशोकराव माने 46 हजार 628 मताधिक्यांनी विजयी झाल्याबद्दल हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे महायुतीच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटप गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, कलाप्पांना साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, सुरेश तानगे, अमित साजनकर, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौगुले, आरपीआय करण माने, निवास माने, भाजपाचे संभाजी चव्हाण, धैर्यशील माने, कुमार कोळी, आदित्य पाटील, अमोल गावडे, विनायक पोतदार, संदीप तोरस्कर तसेच महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.