अलीकडे चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे अनेक भागात भीतीचे वातावरण आहेच. त्याचबरोबर दिवसाढवळ्या चोरी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता पसरली आहे. बंद घराचे कुलूप उचकटून तसेच मंदिरांमध्ये देखील चोरटे डल्ला मारून ऐवज लंपास करत आहेत. हातकणंगले तालुक्यात नुकताच एक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या बाळूमामा मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडली. यामधून सुमारे ६५ हजार रुपये लंपास करण्यात आले. पुजारी संभाजी मंगू माने यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरीचा प्रकार सोमवारी रात्री नऊ ते मंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान घडला. दरम्यान, संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समजते.
पेठवडगाव मधील बाळूमामा मंदिरातील दानपेटी फोडून ६५हजार रुपये लंपास! चोरटे सीसीटीव्हीत कैद….
