इस्लामपूर काँग्रेसकडून डॉ. विश्वजित कदम यांचा सत्कार

पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. विश्वजित कदम यांचा निवडणुकीतील विजयाबद्दल इस्लामपूर शहर काँग्रेसच्यावतीने सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते डॉ. कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश सदस्य ॲड. आर. आर. पाटील, अॅड. अकिब  जमादार, हनुमंत कांबळे, भाऊसाहेब पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.