विधानसभा निवडणुकीनंतर महानगरपालिका गजबजू लागली

राज्यासह  इचलकरंजी विधानसभा निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर लागलीच आचारसंहिता लागू झाल्याने महानगरपालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले होते. महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आल्याने गेल्या दोन-तीन आठवड्यांमध्ये महानगरपालिका सामसूम झाली होती.

तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्याही रोडावली होती. आचारसंहिता लागू असल्यामुळे कोणतीही कामे होत नसल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली होती. इचलकरंजी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर महानगरपालिकेत विविध अधिकाऱ्यांसह कर्मचारी रुजू झाले. तर विविध कामांसाठी नागरिक गर्दी करु लागल्याने सोमवारी महानगरपालिका गजबजून गेल्याचे चित्र दिसत होते. 

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वच अधिकारी व कर्मचारी आपल्या कामांवर हजर झाले. त्यामुळे सोमवारी महानगरपालिका गजबजल्याचे दिसून येत होते तसेच अनेकजण आपल्या कामासाठी आल्याने गर्दी दिसून येत होती.