खानापूर मतदारसंघाच्या बाबर गटातील दादा माणूस म्हणून अमोल बाबर यांच्याकडे पाहिले जाते. केवळ राजकीय चढउतार नाही तर कुटुंबावर जी जी संकटी कोसळली त्यावेळी अमोल बाबर हे पहाडासारखे उभे राहिले. अनिल भाऊंच्या पश्चात झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत अमोल दादांनी रात्रीचा दिवस करून राजकीय जुळण्या लावल्या. सुहास बाबर यांनी अमोल बाबर यांचे योगदान वेळोवेळी सभांमधून बोलून दाखवले.
अनिल भाऊंच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आणि विटानगर पालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. प्रत्यक्ष पद घेण्यापेक्षा पडद्यामागून सूत्रे हलविण्यात अमोल दादांना नेहमीच स्वारस्य राहिले आहे. बाबर गटांमध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये अमोल दादा बाबर यांना कमालीचे महत्त्व आहे. पूर्वी राजकारणात आमदार अनिलभाऊ हे काही मोक्याच्या ठिकाणी अमोल दादांशी सल्ला मसलत करायचे अशी त्यांचे निकटवर्तीय सांगतात. तर आमदार सुहास बाबर त्यांचा कोणताच शब्द मोडत नाहीत.
खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या ऐतिहासिक निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांनी विजय मिळवला. यावेळी कार्यकर्त्यांनी सुहास भैयांना खांद्यावर बसवून नाचवले. परंतु या अलोट गर्दीत मात्र दस्तुरखुद आमदार सुहास बाबर यांनी आपल्या खांद्यावर एकाच व्यक्तीला खांद्यावर घेतले त्या व्यक्तीचे नाव म्हणजे थोरले बंधू अमोल दादा बाबर. खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर बाबर गटाचा यशस्वी सूत्रधार कोण असेल तो म्हणजे अमोल दादा बाबर आहेत हे या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झालेच आहे. विधानसभा निवडणुकीतील किंगमेकर म्हणून अमोलदादा बाबर यांना पाहिले जाते.