विट्यात उद्या ईव्हीएमच्या विरोधात एक दिवसीय उपोषण

नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला हाती आला आणि राज्यात महायुतीचे सरकारने विजय मिळवला आहे. महाराष्ट्रामध्ये जे निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि महायुतीची सत्ता ज्या पद्धतीने आली याबाबत लोकांच्या मनामध्ये संभ्रम व रोशाचे वातावरण आहे. या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून हे सरकार सतत सत्तेत आले असे लोकांची जनभावना झालेली आहे. त्यामुळे ईव्हीएम च्या विरोधात विटा तहसील कार्यालयासमोर आम्ही उद्या बुधवारी 27 नोव्हेंबरला एक दिवसीय लक्षणीय उपोषण करणार असल्याची माहिती बहुजन वंचित आघाडीचे पराभूत उमेदवार संग्राम माने यांनी दिली आहे.