इचलकरंजी विधानसभेचे प्रतिनिधित्व आजपर्यंत अनेक दिग्गजांनी केलेले आहेत. यामध्ये देशभक्त बाबासाहेब खंजिरे, कॉम्रेड एस पी पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, कॉम्रेड के एल मलाबादे यांनी प्रत्येकी एक वेळा, भाजपचे सुरेश हाळवणकर यांनी सलग दोन वेळा तर प्रकाश आवाडे यांनी तब्बल पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
आता या मतदारसंघाची धुरा मतदारांनी डॉ. राहुल आवाडे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी राहुल आवाडे यांना तब्बल एक लाख 31 हजार 919 इतकी विक्रमी मते त्यांच्या पारड्यात घातली आहेत. आज पर्यंतच्या विधानसभेच्या निकालाची आकडेवारी पाहता राहुल आवाडे यांना पडलेले हे मतदान सर्वाधिक आहे.